डी मार्टमधील आणखी तीन कर्मचारी पॉझिटिव्ह तरीही खरेदीसाठी मोठी गर्दी

रत्नागिरी:- डी मार्ट मधील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी 2 रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी पुन्हा 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसात डी मार्ट मधील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पाच रुग्ण सापडल्यानंतर देखील डी मार्ट मध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी आहे. वास्तविक डी मार्ट बंद ठेवून खबरदारी घेणे आवश्यक असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. काल सोमवारी डी मार्टला 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यानंतर सॅनिटायझेशन किंवा इतर खबरदारी न घेता डी मार्ट सुरु ठेवण्यात आले होते. डी मार्ट स्टाफपैकी आणखी काही कोरोना रिपोर्ट येणे बाकी असून कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.