रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार रत्नागिरीतील डी-मार्ट मधील दोन कर्मचारी कोरोना बाधित निघाले आहेत. येथील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली असून बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बाधित रुग्ण सापडल्या नंतर देखील सोमवारी सहा वाजेपर्यंत डी मार्टची सेवा सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
सोमवारी आलेल्या अहवालात तालुक्यात 30 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात डी मार्ट मधील 2 तर जिल्हा परिषदेतील 1 कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला आहे. गेल्या काही दिवसात रत्नागिरी तालुक्यात मोठ्याप्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 2 दिवसांच्या मिनी लाॅकडाऊन तसेच पुढेही लाॅकडाऊन होण्याच्या शक्यतेने आज बरेच लोक खरेदीसाठी घराबाहेर पडले होते.









