Thursday, May 14, 2026
spot_img
Home दापोली टेटवली येथे १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

टेटवली येथे १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली:- तालुक्यातील टेटवली ब्राह्मणवाडी येथे राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुष्मिता बिसाल मगर असे मृतं मुलीचे नाव असून ती मूळची नेपाळ येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिता हिला लहानपणापासून हृदयाचा आजार होता. २०१४ मध्ये तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. ११ मे रोजी तिला उलट्यांचा त्रास होत असल्याने तिने दिवसभर व्यवस्थित अन्न सेवन केले नव्हते. तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबिय चिंतेत होते.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजण्याच्या सुमारास तिचे वडील बिसाल रमेश मगर यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणतीही हालचाल करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पहाटे ३.५६ वाजता तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तंपास दापोली पोलीस करीत आहेत.