रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 78 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात दोन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पर्यंत कोरोनाने 336 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 6 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 337 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 78 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 61 हजार 776 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 14 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 865 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 336 वर पोचली आहे. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.94 टक्के आहे.









