रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तीन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 285 वर पोचली आहे. तर जिल्ह्यात आज 66 कोरोना बाधित सापडले आहेत. यानंतर कोरोना बाधितांची एकूण संख्या 7 हजार 835 झाली आहे.
मागील 24 तासात 198 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत जिल्ह्यत 41 हजार 173 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात 41 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता पर्यंत 6 हजार 841 जण कोरोनामुक्त झाले असून हे प्रमाण 87.31 टक्के इतके आहे.
मृत्यू झालेल्या तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात रत्नगिरीतील 1, खेड 1 आणि चिपळूण तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.63 टक्के आहे. आता पर्यंत सर्वाधिक 77 बळी रत्नागिरी तालुक्यात गेले आहेत. याशिवाय चिपळूण 69, खेड 47, गुहागर 10, दापोली 31, संगमेश्वर 27, लांजा 10, राजापूर 12 आणि मंडणगड तालुक्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









