जिल्ह्यात 24 तासात 512 पॉझिटिव्ह रुग्ण; 13 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 512 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 304 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 208 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1488 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.  नवे 512 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 29 हजार 348 झाली आहे. जिल्ह्यात आज 13 मृत्यूंची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी 310 तर मंगळवारी 622, बुधवारी 462, गुरुवारी 481 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. शुक्रवारी रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 512 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 304 रुग्ण आरटीपीसीआर तर 208 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 29 हजार 348 वर जाऊन पोहचली आहे. मागील 24 तासात 1488 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात  आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 912 जणांपैकी 608 निगेटिव्ह तर 233 तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 88 पैकी 945 निगेटिव्ह तर 880 जण निगेटिव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात मागील 24 तासात 10 तर त्यापूर्वीच 3 असे 13 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 13 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 889 मृत्यू झाले आहेत. नव्याने झालेल्या 13 पैकी रत्नागिरी तालुक्यात 4, संगमेश्वर 2, गुहागर 2, मंडणगड 1, चिपळूण 2, दापोली आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.