रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 353 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे 4 आणि आताचे 2 अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्याने 353 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजार 600 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 4 हजार 492 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 4 लाख 52 हजार 96 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
24 तासात 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 62 हजार 339 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 92.22 टक्के आहे. 24 तासात 6 मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण 2. 85 टक्के आहे.









