रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 711 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 369 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 10 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 181 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 711 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 86 हजार 880 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 12 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 632 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 369 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.63 टक्के आहे.









