Monday, August 31, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदत

रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित ही यादी जाहीर करण्यात आली असून, यावर दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.

यादी कुठे पाहता येईल?
प्रारूप मतदार यादी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध आहे. याशिवाय मतदारांना भारत निवडणूक आयोग eci.gov.in, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र  ceoelection.maharashtra.gov.in, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी : ratnagiri.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवरही आपले नाव तपासता येईल

  • नोंदीतील दुरुस्ती किंवा पत्ता बदलासाठी : नमुना क्र. ८
    हे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांच्याकडे ३० सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. सर्व नागरिकांनी प्रारूप यादीत आपले नाव तपासून आवश्यकतेनुसार मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.