जिल्हाधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक; अनेकांकडे पैशाची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. फेसबुक अकाउंट हॅक करणाऱ्या हॅकरने अनेकांकडे पैशाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. काहीजणांनी याबाबत खातरजमा केली असता ही बाब समोर आली. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन.पाटील यांच्या सरकारी अधिकृत Collectorate Ratnagiri या फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करून संबंधित व्यक्ती जनतेकडे पैशाची मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांचे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाउंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाउंट तयार करून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक,आधिकारी  यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे. रुग्णालय असल्याने पैशाची आवश्यकता आहे.अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे.तरी Collectorate Ratnagiri नावे बनावट असलेल्या अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट येथील त्यांनी नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी बी.एन.पाटील यांनी केले आहे.