Saturday, July 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयस्तंभ येथे एसटीची दोन वाहनांना धडक

जयस्तंभ येथे एसटीची दोन वाहनांना धडक

एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर नगरवाचनाच्या समोर निष्काळजीपणे एसटी बस चालवून रिक्षा व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झालेल्या एसटी चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलवंत मोहन जोंधळे (वय ४१, मुळ रा. लोहा जि. नांदेड सध्या रा. कारवांचीवाडी, रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित एसटी चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जयस्तंभ येथील नगर वाचनालयासमोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षा चालक मनोज विजय कांबळे (वय ४३, रा. उत्कर्षनगर, कुवारबाव, रत्‍नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच-०८ बीसी ७६८१) घेऊन खारेघाट रोड ते कुवारबाव असे जात असताना संशयित एसटी चालक सिलवंत जोंधळे हा आपल्या ताब्यातील एसटी (क्र. एमएच-१४ बीपी- ३८८९) घेवून रत्नागिरी ते पावस जात होते. मनोज कांबळे यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाची दुचाकी (क्र. एमएच-०८ बीए ६३३३ ) धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात रिक्षा आणि दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी मनोज कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.