दर्यासारंग संघटनेला खेड न्यायालयाकडून दिलासा
खेड:- जमावबंदी आदेश असताना एकत्र येवून पुतळा जाळून दंगा करत जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग करून घोषणाबाजी केल्याच्या आरोपातून दर्यासारंग संघटनेतील २९ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
आखिल दाभोळ खाडी भोई समाज संघटनेचे पदाधिकारी असलेले सोनगांवचे दिपक पारधी यांनी या बाबत फिर्याद दिली होती. चार तालुक्यातील ४२ गावांची असमेली संघटना अखिल दाभोळ खाडी भोईसमाज यामध्ये दाभोळखाडीतील भोई समाजाचे लोक एकत्रीत काम करतात. परंतु या संघटनेबदल संशयीत आरोपी सुनिल सखाराम जाधव वगैरे २९ या सर्वानी २७ जानेवारी २०१९ रोजी वाळीत टाकल्याचा आरोप करून मोर्चा काढून पुतळे तयार करून त्याला चप्पलेनेे मारून जाळून टाकले. असे तक्रारीत म्हटले होते.
यावरून त्यावेळी कोवीड अधिनीयमाने जमाव बंदी असताना देखील २०० लोकांचा जमाव केला. त्यामुळे भारतीय दंड विधान कलम १४३, १४७, १४९, ५००, ५०४, ५०६ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ एक लिन चे उल्लंघन ९ ३५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. खेड न्यायालयाने या खटल्या संबंधी अनेक मुद्दे निष्कर्ष काढले, सरकार पक्षातर्फे ९ साक्षिदार तपासण्यात आले. या सर्वांचे उलट तपास अॅड. सुधिर शरद बुटाला व अँड. समिर शरद सेठ यांनी घेतले. गेली २७ वर्षे चालेलेल्या केस मधून दि. २२ मे रोजी सन्माननिय खेड न्यायालयाने दर्यासारंग संघटनेतील २९ जणांची निर्दोष मुक्तता केली.









