चोला मंडलम फायनान्स कंपनी विरोधात बसपा आक्रमक

रत्नागिरी:- चिपळूण येथील चोलामंडलम फायनान्स लिमिटेड कंपनीने केलेल्या बेकायदेशीर दहशतवादी कर्ज वसुली बाबत योग्य ती दाखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र अहिरे यांनी दिला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदे त माहिती देताना श्री आयरे यांनी सांगितले, की किरण मोहिते या इसमाने सन २०१८ या साली ॲपे टेम्पो हे वाहतुकीचे वाहन चिपळूण छोला मंडलम फायनान्स लि. या कंपनी कडुन ४ लाख रु. कर्ज घेवून व्यवसाय करीत आहे. दि. ३ ऑगस्ट पर्यंत रु. १ लाख ९१ हजार ७८३ मुद्दल फेडलेली आहे. त्यावरील व्याज रु .२ लाख ३१३ आजतागायत फेडलेले आहे. ३ ऑगस्ट पर्यंत त्याचे दोन हप्ते थकलेले होते. दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी चिपळूण बँचचे मॅनेजर यांच्याकडे किरण मोहिते हे जावून त्यांना विनंती करण्यात आली व सांगण्यात आले की मी दोन दिवसात माझा एका हप्त्याचे पैसे देईन. हे सांगून आल्यानंतर दुस -याच दिवशी ३ ऑगस्ट रोजी चिपळूण बॅचने वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या रेपो एजन्सी कडून कोणतीही आगावू सूचना न देता बाजारात व्यवसायासाठी उभा असलेला टेम्पो ओढून नेण्यात आला. गाडी ओढून नेण्याच्या कालावधीत श्री. किरण मोहिते हे आपल्या पत्नीला घेवून दवाखान्यात गेले होते. पत्नीला घरी सोडून गाडीच्या ठिकाणी मोहिते आले तेव्हा गाडी तेथे नव्हती म्हणून त्यांनी तात्काळ त्याच दिवशी चिपळूण पोलीस स्टेशनला गाडीच्या चोरीबाबत तक्रार केली. नेहमीप्रमाणे पोलीसांनी तक्रारीकडे कानाडोळा करुन मोहिते यांच्या तक्रारीबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. त्यानंतर मोहीते मॅनेजर यांना भेटले व माझी गाडी तुम्ही ओढली आहे का अशी विचारणा केली असता मला काही माहीत नाही. रेपो एजन्सीने ओढली असेल बॅच मॅनेजरच्या सांगण्याशिवाय रेपो एजन्सी गाडी ओढू शकते का ? असा सवाल मोहिते यांनी यावेळी उपस्थित केला.

त्या नंतर त्यांना  ८०,००० रुपये तात्काळ भरा व गाडी घेवून जा असे सांगण्यात आले. २५ हजार घेवून मोहिते बॅच मॅनेजरकडे गेले असता त्यांना परत निराश करण्यात आले. गाडी ओढून नेण्याचे १० हजार हे रेपो एजन्सीचे आहेत. म्हणजे या फायनान्स कंपन्या गुंडगिरी करुन तसेच दहशतवादी वृत्तीचा रेपो एजन्सी पोसतात की काय हा प्रश्न पडला असे आयरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .

दरम्यान रिझर्व बँकेचे या फायनान्स कंपन्यांना काही नियम अटी असतील त्यांचे या प्रायव्हेट फायनान्स कंपन्या उल्लघंन करताना आढळतात . मी स्वतः जिल्हा व्यवस्थापक श्री . माने यांना विनंती वजा पत्र याबाबत घेवून गेलो होतो . त्यांनी माझे पत्र स्विकारले परंतु तुम्ही थर्ड पार्टी असलेमुळे आम्ही तुम्हाला पोच देवू शकत नाही असे उत्तर दिले . या गोष्टीचा विचार करणे आवश्यक असल्याचेही श्री आयरे यांनी सांगितले . तसेच किरण मोहिते हे रुपये २५००० / – भरावयास घेवून गेले होते . तेही त्यांनी स्विकारले नाहीत व तुम्ही रु .४०,००० / – घेवून या तोपर्यंत तुम्हाला गाडी देणार नाही असे सांगण्यात आले . तरी या फायनान्स कंपनीच्या विरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे .

याबाबत चोलामंडलम फायनान्स लिमिटेड कंपनीने योग्य ती दखल घेऊन श्री मोहिते यांना कंपनी विरोधात आंदोलन खेळणार असल्याचा इशारा श्री आयरे यांनी यावेळी दिला.