गणेशभक्तांसाठी धावताहेत रेल्वेच्या 224 फेऱ्या  

रत्नागिरी:–  गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविक कोकणात येतात. प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखद प्रवासासाठी रेल्वेच्या 224 फेऱ्या चालवण्यात आहेत. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने गणपती महोत्सव या फेऱ्या सोडण्यात येत आहेत. 

 कोविड परिस्थिती घेऊन प्रोटोकॉलचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अत्यंत काळजी घेतली जात आहे. रेल्वे स्थानकांत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना प्रवाशांचे औष्णिक तापमान तपासले जात आहे. राज्य आरोग्य प्राधिकरणाच्या समन्वयाने प्रमुख स्थानकांवर प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उभारल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी, प्रमुख स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेतील अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली जात आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केआरसीएलच्या इतर भागांतील आरपीएफ कर्मचारी देखील रत्नागिरी विभागातील प्रमुख स्थानकांवर जमा आणि तैनात करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी कोकण रेल्वे प्रयत्नशील आहे.