गणपतीपुळे समुद्रकिनारी सापडला खलाशाचा मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथील एमटीडीसी बांबु हाउस समोरील समुद्रकिनारी खलाशाचा मृतदेह सापडून आला. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रघुनाथ दास (४०,मुळ रा.ओडीसा,सध्या रा.मिरकरवाड,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. शनिवार ४ मार्च रोजी सायंकाळी ४ वा.गणपतीपुळे येथील एमटीडीसी बांबु हाउस समोरील समुद्रकिनारी तेथील नागरिकांना एक मृतदेह दिसून आला.याबाबत जयगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.