खेड वरवलीत सापडले 12 पॉझिटिव्ह रुग्ण

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे आणखी बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या भागावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता स्वब टेस्ट कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासांत एकूण २३ नवे रुग्ण सापडले असून कोरोना तपासणी संख्याही वाढवण्यात आली आहे. वरवली धुपेवाडी येथे एकाच वाडीत २५ जणांना कोरोना झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर या भागात आरोग्य यंत्रणेने टेस्टची संख्या वाढवली आहे. या वाडीत आणखी १२ नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात मागील २४ तासांत २३ नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ९, ७६४ झाली आहे. ४०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बुधवारी सहा जणांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या ९, २८९ झाली आहे.