Wednesday, September 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी खेडशी एकतानगर येथील तरुण बेपत्ता

खेडशी एकतानगर येथील तरुण बेपत्ता

बेपत्ता तरुणाची माहिती देण्यासाठी पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी एकतानगर येथून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. सुयोग उत्तम कोलगे (२६, रा. खेडशी एकतानगर रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुयोग हा २० ऑगस्ट रोजी सायंकाळी राहते घरातून केस कापायला जातो असे सांगून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परत न आल्याने याप्रकरणी नातेवाईकांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. काही माहिती असल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.