रत्नागिरी:- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णांवर उपचारासाठी काही खासगी संस्था व रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित व कार्यान्वित करण्यात आली होती. सद्यस्थितीत कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हाभरात सुरू असलेल्या 36 कोविड सेंटरपैकी सद्यस्थितीत केवळ 7 ठिकाणीच कोविड सेंटर सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यांत 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 609 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेली पन्नास टक्केहून अधिक कोविड उपचार सेंटर स्थगित करण्यात आले आहेत. जिह्यात जून, जुलैपर्यंत करोनाचा मोठा फैलाव झालेला होता. मात्र जुलैनंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होउ लागली. सप्टेंबरपासून कोरोनाचा वाढता आलेख खाली खाली येत आता ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात 36 कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्या सेंटरमध्ये एकूण 2,449 इतकी बेडची क्षमता होती. त्यात ऑक्सीजनचे 129 बेड व विना ऑक्सीजनचे 2320 बेडची व्यवस्था केलेली होती. आता त्यामधील केवळ 7 सेंटर सुरू आहेत. उर्रारित सेंटर स्थगित करण्यात आलेली आहेत. कारण त्या सेंटरवर सध्या एकही रुग्ण नाहीत. आगामी काळात कोरोनाचा फैलावाला रोखण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.
सद्या बंद असलेली कोविड केअर सेंटरमध्ये मंडणगड-डाॅ. भाबासाहेब आंबेडकर, मुलांचे वसतीगृह. दापोली-शेतकरी भवन, किसान भवन. खेड-घरडा सेंटर, शिवतेज आरोग्य संस्था, भैरवनाथ कोविड केअर सेंटर. गुहागर- वेळणेश्वर सेंटर, रानवी आजीपीपीएल अॅन्ड केएलएल सेंटर. चिपळूण- समाजकल्याण वसतीगृह वहाळ फाटा, संजीवनी हाॅस्पीटल, मंदार एज्युकेशन एसओसी. एमबीए काॅलेज पेढांबे, साई श्रध्दा पेढांबे सेंटर, संगमेश्वर-डाॅ. भाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, देवरूख, न्यू हायस्कूल, देवरूख, आठल्ये सपे पित्रे काॅलेज देवरूख. रत्नागिरी- सामाजिक न्याय भवन, कुवारबाव, बीएड काॅलेज रत्नागिरी, आयटीआय, गोगटे काॅलेज गर्ल हॉस्टेल, पोलीस क्वार्टर सेंटर, दामले शाळा सेंटर, एमआयडीसी मिरजोळे येथील पोलीस कोविड सेंटर, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. एमआयडीसी, पेडियाट्रिक काविड सेंटर रत्नागिरी. लांजातील सेंटर अने विद्यानिकेतन देवधे सेंटर, डॉ. श्रोते कोविड सेंटर. राजापूरमधील खापणे काॅलेज रायपाटण, धारतळे कोविड सेंटरचा समावेश आहे.
तर जिल्ह्यात सद्या सुरू असलेली कोविड केअर सेंटरमध्ये खेड नगर परिषद कोविड सेंटर, अरुंधती पाध्ये इंग्लिश हायस्कूल, देवरुख, रत्नागिरी नगर परिषद कोविड सेंटर, गद्रे मरीन कंपनी, रत्नागिरी कोविड सेंटर, जेएसडब्ल्यू चाफेरी कोविड सेंटर, ग्रामीण हाॅस्पीटल पाली, रत्नागिरी, गोळप-पावस कोविड सेंटर, रत्नागिरी यांचा समावेश आहे.









