कोरोना बाधित रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यावरून तणाव 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक राजीवडा भागातील एक कोरोना रुग्णाला दाखल करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

काही स्थानिकांकडून या कोरोना बाधित रुग्णाला उपचारासाठी नेताना विरोध करण्यात आला. आरोग्य यंत्रणा कोरोना बाधित रुग्णाला दाखल करताना येथील जमाव आरोग्य कर्मचाऱ्यांना हाताळताना परिस्थिती हाताबाहेर गेली. आणि या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलावून परिस्थिती हाताळण्यात  आली.