Tuesday, August 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी कोतवडे येथील वृद्धाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू

कोतवडे येथील वृद्धाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. नारायण भिवा पवार (वय ६७, रा. कोतवडे, घारपुरीवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नारायण पवार यांना किडनीचा आजार होतो गेली दोन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.