रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर एप्रिल महिन्यापासून प्रचंड गर्दी होती. त्यामध्ये काही तिकीट नसलेले प्रवासीही आढळून आले आहेत. गेल्या सात महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहिम हाती घेतली आहे. मागील सात महिन्यात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारात कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल 15 कोटी 21 लाख इतका दंड वासून केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर एसटीसह खासगी वाहनाने प्रवास करण्यापेक्षा लोकांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी होते. गणपती, दिवाळी, ख्रिसमस या सणांसह उन्हाळी सुट्टीत चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात. यावर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेला रेकॉर्डब्रेक गर्दी होती. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मोठ्याप्रमाणात गर्दी वाढली होती. त्यामध्ये काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोकण रेल्वेच्या विशेष पथकाकडून तपासणी सुरू झाली आहे.
मागील सात महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने रेकॉर्डब्रेक दंडात्मक कारवाई केली आहे. सात महिन्यात 6 हजार 413 कारवाया करत तब्बल 15 कोटी 21 लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.









