रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-तारवेवाडी येथे पडक्या घरामध्ये प्रौढ मृतावस्थेत आढळला. प्रसाद श्रीराम कोकजे (वय ४१, रा. निवळी, कोकजेवठार, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद कोकजे हे दारुच्या आहारी गेलेले होते. ते दारु पिऊन निवळी तारवेवाडी येथील श्री पवार यांच्या जमिनीमधील पडक्या घरात मृतावस्थेत आढळले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









