कोंड असुर्डे येथे रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

संगमेश्वर:- रेल्वेच्या धडकेत बिबट्या वाघाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजता दरम्यान संगमेश्वर जवळच्या कोंड असुर्डे येथे रेल्वे रुळावर घडली.

शुक्रवारी सकाळच्या दरम्यान संगमेश्वर जवळच्या जांभूळवाडी या ठिकाणी रेल्वे रुळावर बिबट्या वाघ मृत्यूमुखी पडल्याचे संगमेश्वर पोलिसांनी वन विभागाला कळवले. बिबट्या वाघाचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर वन विभागाचे वनपाल तोफिक मुल्ला वनरक्षक सुरज तेली वनरक्षक अरुण माळी यांच्यासह पोलीस पाटील सुभाष गुरव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केला असता बिबट्याचा रेल्वे दरम्याने ट्रॅकवर मृत्यू झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता सदरचा बिबट्या मादि जातीचा असून दोन वर्षाचा असल्याचे त्यांनी सांगितले सदरच्या बिबट्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेलोरे यांनी शवविच्छेदन केले