कोंडीच्या पुलावरून वाहून गेलेल्या प्रौढाचा मिळाला मृतदेह

दापोली:- दापोली तालुक्यातील वणंद येथे सोमवारी सकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राजेंद्र सोनू कोळंबे (४५) यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सापडला. वणंद येथील कोंडीच्या पुलावरून कामावर जात असताना राजेंद्र कोळंबे हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते.

या पुलापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. राजेंद्र कोळंबे यांच्या शोधकार्यासाठी दापोली पोलीस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि युवक यांनी कालपासून कसून शोधमोहीम राबवली होती. अखेर, मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.