Monday, May 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुवारबाव येथे डंपर-चारचाकीचा अपघात; तिघे जखमी

कुवारबाव येथे डंपर-चारचाकीचा अपघात; तिघे जखमी

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रस्त्यावर डंपर व चारचाकी अपघात झाला. या अपघातामध्ये मोटारीतील तिघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) रात्रीच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेंद्र दत्ताराम कांबळे (वय ३९, रा. एसटी कॉलनी, रत्नागिरी) हे व त्यांची दोन मुलं आदित्य व सलोनी असे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ५२०४) ने शुक्रवारी (ता. १५) आपल्या मुळ गावी नांदगाव-चिपळूण येथे गेले होते. तेथून परत येत असताना शनिवारी रात्री कुवारबाव रस्त्यावरील उतारात डंपरने जोरदार धडक दिली. या मध्ये ते स्वतः व दोन मुलं जखमी झाली. उपचारासाठी तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आली आहे. डंपर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.