कुवारबाव म्हाडा कॉलनी येथील बंद घराला आग; लाखोंचे नुकसान

रत्नागिरी:- शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घरातील फर्निचर आगीमध्ये जळून खाक झाले आहे ती घटना कुवारबाव म्हाडा कॉलनी येथे घडली.


कुवारबाव परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनी येथील बंद घरांमध्ये गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक धुराचे लोळ बाहेर येऊ लागले ग्रामीण पोलिसांच्या नजीक असलेल्या या कॉलनीतील एका घरातून धुराचे लोळ येऊ लागल्याने परिसरात धावाधाव उडाली बघता-बघता आगीचा भडका उडाला. म्हाडा कॉलनी येथील गोविंद खेडेकर यांच्या मालकीचे हे घर असून खेडेकर हे मुंबई येथे वास्तव्याला आहेत.

खेडकर यांच्या घरातून आगीचे लोळ येऊ लागल्याने येथील ग्रामस्थांनी तात्काळ शहर पोलिसांनी संपर्क साधला कुवारबाव चौकीतील पोलीस कर्मचारी गायकवाड जाधव व पोना. रोशन सुर्वे हे घटनास्थळी रवाना झाले. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला आधीची माहिती दिली होती नगरपरिषदेचे एम आय डी सी चा बंब घटनास्थळी दाखल झाला शर्थीच्या प्रयत्नानंतर की आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आगीमध्ये घरातील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे या घटनेची नोंद शहर पोलीस अंकात करण्यात आली आहे.