किर्तीनगर येथे टेम्पोची दुचाकीला धडक

रत्नागिरी:- शहरातील किर्तीनगर- कदमवाडी येथे टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वार जखमी झाला. शहर पोलिस ठाण्यात संशयित अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास चर्मालय ते विमानतळ जाणाऱ्या रस्त्यावर किर्तीनगर-कदमवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रदिपकुमार चुन्नीलाल भारती (वय २६, रा. डिमार्ट जवळ एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी. मुळ ः रा. रानी नगर खेरी राज्य उत्तरप्रदेश) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ७३७७) सोबत रविकिशन उमाशंकर निसाद यास मागे बसवून घेऊन चर्मालय ते किर्तीनगर जात असताना टेम्पो चालकाने किर्तीनगर कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर अचानक वळविल्यामुळे टेम्पोची दुचाकीला धडक झाली. या अपघातात दोघे जखमी झाले. या प्रकरणी प्रदिपकुमार भारती यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.