रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील सुरुबानाला गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे आणि धुराचे लोट पाहून येथील स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य नसल्याचा अंदाज येताच तत्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. गुरुवारी रात्री लागलेली आग पहाटे तीन वाजता विझवण्यात आली. मात्र विझलेली आग शुक्रवारी सकाळी पुन्हा पेटली. शुक्रवारी दुपारी आगीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आले.
काळबादेवी समुद्रकिनारी सुरुबनाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. समुद्राच्या उधाणा पासून आणि वादळी वाऱ्यांपासून सुरक्षितता यासाठी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. काळबादेवी येथील याच सुरुबनात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. आज लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सुरूबनात आग लागल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील यांना देण्यात आली. काळबादेवी सुरुबनात आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील आदेश कदम आणि ग्रामपंचायत सदस्य समीर शेट्ये यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुबनात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. लागलेली आग विझवण्यात मर्यादा येत असल्याने तत्काळ रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला एक बम्ब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचा विळखा वाढत गेल्याने दुसऱ्या बंबला देखील बोलावण्यात आले. अखेर शुक्रवारी पहाटे तीन वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, विझलेली आग शुक्रवारी सकाळच्या सुमारास पुन्हा पेटली. आज पुन्हा लागल्याचे लक्षात येताच पुन्हा रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला बोलावण्यात आले. अथक प्रयत्नानंतर दुपारच्या सुमारास लागलेली आग पुन्हा विझवण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी सुरुबनात लागलेली आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.