रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी होत असला तरी दररोज पॉझिटिव्ह रुग्ण सापडतच आहेत. शनिवारी रात्री तालुक्यात 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यात 5 जण अँटिजेन टेस्ट केलेले तर 13 जण आरटिपीसीआर टेस्ट मधील पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
नव्याने सापडलेल्या 18 रुग्णांमध्ये कारवांचीवाडी परिसरातील तब्बल पाच रुग्ण आहेत. नाचणे परिसरात 3 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय गावखडी, चर्मालय, झारणी रोड, साखरपा, शेटे नगर, देवरुख, नेवरे, कुवारबाव, मिरजोळे आणि जयगड मधील एका कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.









