काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांचे निधन 

रत्नागिरी:- कॉंग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले (वय 62) यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

ॲड. विजयराव भोसले हे नाबार्ड ऑल इंडिया युनियनचे ते सरचिटणीस होते. 2009 मध्ये दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. सन 2000 पासून ते जिल्हा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. यानंतर त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. 

मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली. ॲड. विजय भोसले यांच्या निधनामुळे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे खूप मोठे नुकसान झाले आहे.