ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसलेल्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील गोडबोले स्टॉप येथे ऑनलाईन कर्जप्रकरणात फसललेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी 5.30 वा.सुमारास उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कैसर उस्मान गुहागरकर (29,रा.आदिनाथ पॅराडाईज गोडबोले स्टॉप,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याचा भाउ एजाज दाउद हुनेरकर (47,रा.आदिनाथ पॅराडाईज गोडबोले स्टॉप,रत्नागिरी) याने शहर पोलिसांना खबर दिली.त्यानुसार, कैसर हा एजाज याचा मामे भाउ आहे. काही दिवसांपूर्वी कैसर ऑनलाईन कर्ज घेउन फसला होता.या कारणातून त्याने शनिवारी घरात कोणीही नसताना गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी 5.30 वा.सुमारास एजाज घरी परतला असता त्याला कैसर गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.याप्रकरणी त्याने शहर पोलिसांना माहिती  देताच त्यानीं तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत