रत्नागिरी:- रत्नागिरी ते गणपतीपुळे रस्त्यावरील आरे गावाच्या मार्गावर एक भीषण रस्ता अपघात झाला असून यात एका २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
तेजस दादासाहेब पूकळे (वय २५, रा. विटा, जि. सांगली) हे आपल्या ताब्यातील हुंडाई व्हेन्यु कारने (क्र. MH-10-DQ-4481) आई-वडील आणि बहिणीसह प्रवास करत होते. रात्री ९:१५ च्या सुमारास आरे गावाच्या रोडवर आले असता, अचानक एका अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्र. MH-10-EA-7964) कारच्या डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. ट्रॅक्टर चालक ओंकार मानसिंग पाटील याने निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात घडवला.
या अपघातात कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या, तर फिर्यादीची बहीण तन्वी दादासाहेब पूकळे (वय २१) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दादासाहेब पूकळे, संगीता पूकळे आणि तेजस पूकळे हे यात जखमी झाले आहेत. अपघातानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









