आज, उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात आजपासून बुधवार 22 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे. 
 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज व 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत  जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने  केले आहे.