रत्नागिरी:- आगामी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात किरण सामंत आमच्या विरोधात असतील तरी शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार अडिच लाखाच्या फरकाने निवडुण येईल. ही काळ्या दगडावरीच भगवी रेघ आहे. सत्तेचा दुरुपयोग करत नामोहरम करून शरण ये, तर अभय देतो, असा घाणेरडा प्रकार सुरू आहे, असा आरोप उबाठाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
सत्तेच्या दाबाबल न डगमगता आम्ही उभे आहोत. खासदार आणि आमदारही आम्ही निवडुण आणू, असा निर्धार देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील विभाग प्रमुकांशी सध्याच्या राजकीय परिस्थिवर चर्चा करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालका प्रमुख बंड्या साळवी, शेखर घोसाळे, आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या समोर कोणही उमेदवार असला तरी शिवसेना आणि महाविकसा आघाडीचा जो उमेदवार असेल तो अडिच लाखाच्या फरकाने निवडुन येईल. अडिच लाखाचे गणित आता सांगणार नाही. परंतु महाराषट्राच्या जनतेमध्ये बेईमानी, गद्दारांबद्दल असलेली चिड, खालेल्या ताटात घाण करणाऱ्या अवलादीबाबर चिड आहे. ती मतदानात दिसून येईल. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल का, या प्रश्नावर श्री. राऊत म्हणाले, शिवसेना एवढी मजबुत आहे. आमच्यात सक्षम उमेदवार असल्याने दुसरीकडुन आलेला उमेदवार देण्याची आम्हाला गरज नाही.
गद्दारांना शिवसेनेचे दरवाचे कायमचे बंद
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतही प्रवेश सुरू आहेत. मुंबईत लवकरच प्रवेश होणार आहे. परंतु दुसऱ्या पक्षातील लोकांना घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. इतर पक्षातील घेत असताना गद्दारी आणि बेईमानी करणाऱ्यांना शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत.