रत्नागिरी:- जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. फिनोलेक्स कॉलेज जवळ, मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १४ फेंब्रुवारी २०२३ ते २९ एप्रिल २०२४ या कालावधित घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार श्रीमती शोभा विठ्ठल तळेकर (रा. मिरजोळे रत्नागिरी) यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उदरनिर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून १४ फेंब्रुवारी प्रति महिना ३ हजार रुपये संशयित राजू तळेकर यांनी शोभा तळेकर हिस द्यावेत न दिल्यास शिक्षेस पात्र राहातील असे आदेश दिले होते. मात्र याकडे संशयिताने कानाडोळा केला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा उपमर्द केला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.