आंबा घाटातील ‘त्या’ तरुणाच्या शरीरावर होत्या जखमा

देवरुख:- आंबा घाटात जखमी अवस्थेत सापडून मृत झालेल्या सुधीर अर्जुन यादव या सातारा जिल्ह्यातील तरुणाच्या शरीरावर जखमा असल्याचे पोलिसांनी केलेल्या पाहणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. अधिक तपासासाठी. यादव याच्या नातेवाईकांना शनिवारी साखरपा दुरक्षेत्रात बोलावण्यात आले आहे.

पाटण तालुक्यातील साईकडे येथील रहिवासी सुधीर यादव हा कराड येथील मित्र आशिष शांताराम भावके याच्यासमवेत मंगळवारी रत्नागिरी येथे फिरायला आला होता. मंगळवारी रत्नागिरी येथे त्यांनी वस्तीदेखील केली. सुधीर याने वडिलांना फोनदेखील केला होता. बुधवारी सकाळी आरे-वारे निसर्गरम्य परिसर पाहून ते परतीच्या दिशेने वळल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. मलकापूर येथे बुधवारी दुपारी सुधीर यादव वाहनातून खाली उतरला अन् परत आला. नाही. महामार्ग पोलिसांना सुधीर आंबा घाटात सुधीर यादव महामार्गानजीक जखमी अवस्थेत मिळून आला.

त्याला उपचारासाठी साखरपा शरीरावर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र सुधीर याचा मृत्यू झाला. सुधीरच्या शरी छोट्या छोट्या जखमा दिसून आल्या आहेत. त्याच्या पायालाही दुखापत झाली होती. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधीरच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.