रत्नागिरीः– कृषी पणन मंडलामार्फत आंबा हंगामाची पुर्वतयारी करण्यात येत आहे. निर्यात वृध्दीसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राची उभारणी करुन निर्यातीला चालना देण्यात येणार आहे.तर यावर्षी अर्जेंटीना आणि मलेशिया या देशांना आंबा निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
व्हेपर हीट ट्रीटमेंट,विकीरण सुविधा सुसज्ज करण्यात आल्या असुन सुविधेचा लाभ घेणेबाबत आंबा निर्यातदारांना कृषी पणन मंडळामार्फत आवाहन करण्यात येत आहे. जपान व दक्षिण कोरीया या देशांना आंबा निर्यातीकरीता देशांनी आपले निरीक्षक न पाठविता केंद्र शासनाच्या एन.पी.पी.ओ विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया करून निर्यातीला परवानगी दिलेली आहे. तसेच न्युझिलंड या देशाने यापुर्वीच परवानगी दिलेली असल्याने या देशांमध्ये लवकरच आंबा निर्यात सुरू होणार आहे.
विकीरण सुविधा केंद्र, वाशी येथुन ऑस्ट्रेलिया व अमेरीकेकरीता एप्रिल, २०२१ च्या पहिल्या आठवड्यापासुन निर्यातीकरीता विकीरण प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर यावर्षी अर्जेंटीना आणि मलेशिया या देशांना आंबा निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
पणन मंडळाच्या आंबाविषयक सर्व सुविधा संगणक प्रणालीद्वारे आंब्याच्या देशभरातुन विवीध पॅकहाउसेस सोबत जोडल्या गेल्याने त्याद्वारे थेट मॅगोनेट मधे नोंदणीकृत शेतकर्यांसमवेत सुविधेचे लिंकींग झालेले आहे. यामुळे आयातदारास आंब्याच्या गुणवत्तेबाबत खात्री मिळत असुन निर्यातवृद्धीस मदत होत आहे
कृषी पणन मंडळमार्फत आंबा विक्री व निर्यातीबाबत कार्यशाळा, आंबा उत्पादक शेतकर्यांनी निर्यातदार व्हावे यासाठी निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम व अपेडाचे सहकार्यातुन आंब्यासाठी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे नियोजन करण्यात यंणार आहे.