अपक्ष नगरसेवकांची झाडू, नारळ निशाणीला पसंती

रत्नागिरी नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी 25 असे 28 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अनेक अपक्ष नगरसेवकांनी झाडू, नारळ या निशाणींना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवार असून तीन उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत यामध्ये शिल्पा सुर्वे धनुष्यबाण, शिवानी राजेश सावंत-माने या मशाल तर वाहिदा बशीर मुतुर्झा या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेतर तर तीन उमेदवार या अपक्ष आहेत. या अपक्ष उमेदवारांमध्ये प्राजक्ता किणे सीसीटीव्ही कॅमेरा, संध्या कोसुंबकर फलंदाज तर ॲड. सुश्मिता शिंदे या झाडू निशाणीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

रत्नागिरीत एकूण 16 प्रभाग असून प्रभाग 1अमध्ये अपक्ष उमेदवार रुक्साना प्रभुलकर यांनी झाडू निशाणी तर ब मध्ये रमीझ झारी यांनी झाडू, अनिकेत वालम नारळ तर मिलींद साळवी यांची शिटी ही निशाणी आहे. प्र. 2 अमध्ये अपक्ष उमेदवार सोनाली केसरकर व ब मधीलयोगेश हळदवणेकर यांची निशाणी बॅट आहे. प्र. 3 ब मध्ये मतीन बावाणी यांची निशाणी नारळ आहे. प्र. 4अमध्ये सायमा काझी यांची निशाणी नारळ, नफिसा मजगावकर यांची झाडू तर ब मध्ये इम्रान नेवरेकर यांची निशाणी ॲटो रिक्षा तर रहिल मुकादम यांची एअर कंडिशनर ही निशाणी आहे. प्र. 5 बमध्ये सरिता कदम यांची निशाणी नारळ आहे.प्र. 7 अ निलेश आखाडे यांची निशाणी नारळ आहे. 8 अमध्ये स्नेहा ठिक यांची बॅट, ब मध्ये शाहीद वस्ता यांची निशाणी छत्री आहे. 9 बमध्ये संध्या कोसुंबकर यांना घड्याळ तर ॲड. तमन्ना झारी यांना झाडू प्र. 11 अमध्ये तुषार कांबळे यांना नारळ, 12अमध्ये मैथिली मयेकर यांची निशाणी होडी आहे तर ब मध्ये सचिन तळेकर यांची निशाणी नारळ आहे. 13 ब मध्ये प्रसाद भुते यांना नारळ ही निशाणी मिळाली आहे.14 बमध्ये आशिष मोरे यांना नारळ, 15 बमध्ये संकेत चवंडे यांना नारळ तर 16 अमध्ये रेहाना वस्ता यांना झाडू तर ब मध्ये खलील वस्ता यांना झाडू ही निशाणी मिळाली आहे. त्यामुळे काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी, चौरंगी व पंचरंगी निवडणूक रंगणार आहे.
शिवसेना, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि बसपा हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.