राजापूर:- कोल्हापूर मार्गावरील अनुस्कुरा घाटात आज 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे, या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मार्ग सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूकीबाबत योग्य तो बंदोबस्त करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबी व कर्मचारी पाठविण्यात आले असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.