Monday, October 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी नौकेवरील साहित्य स्थलांतरित केले; महिलेविरुद्ध गुन्हा

नौकेवरील साहित्य स्थलांतरित केले; महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील कर्ला जेटी येथील नौकेवरील साहित्य स्थलांतरित करु नये अशी नोटीस सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिली. संशयित नौका मालकाने ते साहित्य स्थलांतरीत केले. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध आदेशाची अवज्ञा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुगंधा सचिन टाकळे (रा. पंधरामाड, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ७) ते शनिवारी (ता. १०) या कालवाधीत कर्ला जेटी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चिन्मय जोशी (वय ३०, रा. श्रेयस अपार्टमेंट गोडबोले नगर, नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी संशयित बोट मालक सुगंधा टाकळे यांना त्यांच्या गुरुप्रसाद नौका या नौकेवरिल साहित्य स्थलांतरित करु नये अशी त्यांना नोटीस दिली होती. मात्र त्यांनी नौकेवरिल साहित्य स्थलांतरित केले. या प्रकरणी चिन्मय जोशी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.