रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव रेल्वेस्टेशन येथे गिरीरत्न हॉटेल समोर रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबरला रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौरभ सचिन पिलणकर (वय २५, रा. सावली बंगलो, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी आपली दुचाकी रेल्वेस्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल समोरिल पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी सौरभ पिलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









