Friday, November 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी ते पावस मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ते पावस मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस बायपास मार्गावरील एका हॉटेल समोरिल वळणावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी (ता. २५) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उपेंद्र विठ्ठल पाटील (वय ५७, रा. गावखडी, सुरकरवाडी, रत्नागिरी) हे आपल्या दुचाकीने रत्नागिरीच्या दिशेने जात होते. हॉटेल आराध्या वळणावर समोरून आलेल्या ट्रक चालक संशयित अंकीत ओकार नाथ (वय २७, रा. ईकलेरा माताजी जि. देबास मध्यप्रदेश ) याने दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणी उपेंद्र पाटील यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.