Friday, November 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जोशी पाळंद येथे टेरेसवरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी जोशी पाळंद येथे टेरेसवरुन पडून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील जोशी पाळंद येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आली आहे. साईश दिलीप बाईग (वय २९, रा. जोशी पाळंद आर्केड, जोशी पाळंद रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २४) रात्री पावणे नऊच्या सुमारास निदर्शनास आली

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साईश हा सात ते आठ वर्षापासून मनोरुग्ण होता. त्याच्या उपचार सुरु होते. त्याला टेरेसवर फिरण्याची सवय होती. मंगळवारी सांयकाळी सातच्या सुमारास तो टेरेसवर फिरत असताना तोल गेल्याने तो खाली पडला. रात्री साडेआठच्या सुमारास इमारतीखाली लोक जमल्याने त्याचा मुलगा खाली पडल्याचे त्याच्या वडिलांना समजले. त्यांनी तत्काळ खाली जाऊन पाहिले असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.