Saturday, November 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक

देवरुख:- एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले आहे.

वेदांत विजय पेडणेकर (२०, रा.. खेडशी भंडारवाडी, ता. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वेदांत व पीडित विद्यार्थिनी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. वेदांत याने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे विद्यार्थिनीने फिर्यादीत नमुद केले आहे. हा प्रकार मार्च २०२५ ते मे २०२६ या कालावधीत घडला. युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन वेदांत याच्यावर मंगळवारी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वेदांत याला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी २७ पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. वेदांत याचे, अन्य युवतीशी प्रेमसंबंध जुळले आहेत. नव्याने प्रेम संबंध जुळलेल्या युवतीने वेदांतच्या पहिल्या प्रेयसीला फोन केला अन-वेदांत व आपले प्रेम संबंध असल्याचे सांगितले. यानंतर हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.