रत्नागिरीत एकाला पाच हजारांचा दंड
रत्नागिरी:- रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देण्याच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज आणि हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांच्या अवैध व्यवसायप्रकरणी रत्नागिरीतील चंद्रकांत अशोक देशमुख (वय ४१, रा. खेडशी, रत्नागिरी) याला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास दहा दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
रेल्वे सुरक्षा बल, रत्नागिरी यांनी या प्रकरणी कारवाई केली होती. दिनांक २२ जून २०२६ रोजी रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देणे अथवा रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची खरेदी-विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय केल्याचा आरोप देशमुख याच्यावर ठेवण्यात आला होता. भारतीय रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३(१) (अ) अन्वये त्याच्याविरुद्ध संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला. न्यायालयात आरोपीला खटल्याच्या कागदपत्रांच्या प्रती मिळाल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतरत्याच्यावरील आरोप समजावून सांगण्यात आले. आरोपीने गुन्हा समजल्याचे सांगत तो स्वेच्छेने कबूल केला. यापूर्वी कोणताही गुन्हा केल्याचे त्याच्याविरुद्ध सिद्ध झालेले नाही, हा पहिलाच गुन्हा असल्याचे तसेच गुन्ह्याचे स्वरूप किरकोळ असल्याचे नमूद करीत त्याने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देण्याच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज आणि हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांच्या अवैध व्यवसायप्रकरणी रत्नागिरीतील चंद्रकांत अशोक देशमुख (वय ४१, रा. खेडशी, रत्नागिरी) याला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास दहा दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे.









