Wednesday, November 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप मेसेज

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नावाने बनावट व्हाट्सॲप मेसेज

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो वापरून अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सॲपद्वारे पैसे पाठवण्याची मागणी करणारे बनावट संदेश पाठवले जात आहेत. हा संदेश अथवा संबंधित मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी यांचा नसून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारे या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 7541080700 या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा फोटो लावून व्हाट्सॲपवर पैसे पाठवण्याबाबत संदेश पाठवण्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकार पूर्णपणे बनावट असून, अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी व संबंधितांनी 7541080700 या क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही व्हाट्सॲप मेसेजला प्रतिसाद न देता सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.