Tuesday, November 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गणपतीपुळे मंदिरातून घंटा चोरी करणाऱ्याला कोल्हापुरातून अटक

गणपतीपुळे मंदिरातून घंटा चोरी करणाऱ्याला कोल्हापुरातून अटक

रत्नागिरी:- तालुक्यातील श्री देव गणपतीपुळे देवस्थान मालकीच्या मंदिर प्रदक्षिणा मार्गावरून दोन घंटा चोरी करणाऱ्या जयगड पोलिसांनी हातकणंगले कोल्हापूर येथून अटक केल़ी संतोष मारुती मकदुम (44, ऱा शाहुवाडी, हातकणंगले जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आह़े घंटा चोरी केल्याची 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.54 ते सायंकाळी 6 या कालावधीत घडली होती.

गणपतीपुळे येथील प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या तळ्याजवळील फायबर शेडच्या लोखंडी बारला लोखंडी साखळीने अडकवलेली 12 हजार रुपये किमतीची, 3 किलो वजनाची आणि 18 सेमी व्यासाची पितळी घंटा चोरटय़ाने लांबवली होत़ी प्रदक्षिणा मार्गाच्या उतारावरील पूर्वेकडील ‘देवळी‘ या देवस्थानच्या ठिकाणी लोखंडी रॉडला अडकवलेली 4 हजार रुपये किंमतीची, 1 किलो वजनाची आणि 12.5 सेमी व्यासाची दुसरी पितळी घंटाही चोरून नेली.

याप्रकरणी नीलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (49, रा. गणपतीपुळे, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकाराने देवस्थान परिसरात खळबळ उडाली होत़ी जयगड पोलिसांनी चोरटय़ाविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.