रत्नागिरी:- हॉटेलचा मालक असलेल्या आपल्या भावाला धमकी दिल्याच्या गैरसमजातून कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वा.सुमारास मासेबाव येथील सिध्दिविनायक हॉटेलमध्ये घडली.
राजू यशवंत रामगडे (रा.करबुडे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात कामगार निलेश गणपत रावणांग (37,उक्षी बनाचीवाडी वरचीवाडी,रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी हा मासेबाव येथील दिपक रामगडे यांच्या मालकीच्या सिध्दीविनायक हॉटेममध्ये काम करत होता. तो सूट्टी मिळवण्यासाठी मालक दिपक रामगडे याचा भाउ राजू रामगडे याच्याकडे विचारणा करण्यासाठी गेला होता. तेव्हा कामगार निलेश रावणांग याने आपला भाउ व हॉटेलचा मालक दिपक रामगडे याला धमकी दिली असल्याचा गैरसमज राजूने करुन घेतला.
या गैरसमजातून त्याने फिर्यादील निलेशला शिवीगाळ करुन लाकडी बांबुने पाठीवर मारहाण करुन लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच तू पोलिस ठाण्यात जाउन तक्रार दिलीस तर तुला ठार मारेन अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.








