Monday, November 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड लाईट हाऊससमोर बोटीवरून पडून खलाशी बेपत्ता

जयगड लाईट हाऊससमोर बोटीवरून पडून खलाशी बेपत्ता

रत्‍नागिरी:- तालुक्यातील जयगड लाईट होउस समोरील समुद्रात बोटीवरुन तोल जाउन पडलेला खलाशी बेपत्ता झाल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात जयगड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वा.सुमारास घडली आहे.

राजेश बाबू मलावकर (42,रा.मुळ रा.अफटोल पाडा धामणगाव डहाणू,पालघर) असे अपहरण झालेल्या खलाशाचे नाव आहे. महेश कुवरा हा असद अन्वर धालवेलकर (रा.साखरी नाटे यांच्या मालकीच्या अलिझा झैनाब या बोटीवर मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. मासेमारीसाठी गेला होता. बुधवार 18 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वा.सुमारास बोटीवरुन लघूशंका करत असताना त्‍याचा तोल जाउन तो समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला.