Sunday, November 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी साळवी स्टॉप रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

साळवी स्टॉप रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते चर्मालय जाणाऱ्या रस्त्‍याच्या बाजुला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.37 ते 7.50 वा.सुमारास करण्यात आली आहे.

साबीरअली हशमतुल्लाह पेजे (40,रा.गावखडी मुस्लिमवाडी,रत्‍नागिरी) आणि शैलेंद्र अशोक पुजारी (44,रा.शांतीनगर,रत्‍नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोन्ही संशयित आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्‍यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.